Ad will apear here
Next
‘ज्यू वारशाच्या वास्तुरचना’ विषयावर सायन्स गप्पा
डॉ. पुष्कराज सोहोनी पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्टिफिक अँड एज्युकेशनल रिसर्च (आयसर) आणि गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमात आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. पुष्कर सोहोनी यांच्याशी संवाद साधण्याची संधी विज्ञानप्रेमींना उपलब्ध झाली आहे. 

८ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता  नवी पेठ येथील ‘एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन’च्या सभागृहात हा गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे. डॉ. सोहोनी मुंबई, पुणे आणि कोकणातील ‘ज्यू वारशाच्या वास्तूरचना’ या विषयावर गप्पा मारणार आहेत. ज्यूंच्या पुरातन इमारती, विशेषत: मुंबई, पुणे आणि उत्तर कोकणामधील अनेक गावांमध्ये ऐतिहासिक इमारती, स्मारके आणि बांधकामाच्या जागा, सिनेगॉग, स्मशाने, इस्पितळे, शाळा, ग्रंथालये, वखारी, ज्यू उद्योगपतींच्या कापड गिरण्या, पुतळे आणि अन्य नागरी सुविधा यावर ज्यूईश वास्तूरचनेचा प्रभाव दिसून येतो. या वास्तूरचनांमधील विशेषता आणि ज्यू वास्तूरचनेतील समृद्ध परंपरा डॉ. सोहोनी सांगणार आहेत.

डॉ. पुष्कर सोहोनी यांनी अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील पेनसिल्वानिया विद्यापीठातून हिस्टरी ऑफ आर्टस् या विषयात डॉक्टरेट संपादन केली आहे. सध्या ते आयसर, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत व ऐतिहासिक वास्तुरचना याविषयी संशोधन करत आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. तरी अधिकाधिक विद्यार्थी, नागरिक यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यवाह नीता शहा यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिनांक : शुक्रवार, आठ डिसेंबर २०१७
वेळ : सायंकाळी सव्वासहा
ठिकाण : एस. एम. जोशी फाउंडेशन हॉल, नवी पेठ, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZYHBJ
Similar Posts
‘सायन्स गप्पा’ कार्यक्रमात ‘ओशियनोग्राफी’वर चर्चा मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक अँड एज्युकेशनल रिसर्च (आयसर) आणि गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमात, विज्ञानप्रेमींना आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. रजनी पंचांग यांच्याशी संवाद साधता येणार आहे. ११ ऑगस्ट २०१७
‘सायन्स गप्पा’मध्ये डॉ. विनिता बाळ पुणे : मराठी विज्ञान परिषद व ‘आयसर’तर्फे ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विज्ञानप्रेमींना आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. विनिता बाळ यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ‘जीवविज्ञान–एक बायकी दृष्टिकोन’ या विषयावर हा गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे.  पुण्यातील
‘सूक्ष्म कणांच्या अभ्यासातून कळेल खगोलशास्त्राची व्याप्ती’ पुणे : ‘अणू आणि रेणू या लहान कणांचे विश्व व्यापक आहे. उच्च प्रतीच्या ऊर्जेच्या साह्याने आपण विश्वातील या लहानातील लहान कणांना पाहू शकतो. अवकाशातील विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी हे सूक्ष्म कण उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे येत्या काळात या सूक्ष्म कणांच्या अभ्यासातून खगोलशास्त्रातील माहितीची अनेक नवीन दालने
डॉ. सौरभ दुबेंशी गप्पा पुणे : मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक अँड एज्युकेशनल रिसर्च (आयसर)   आणि गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमात आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. सौरभ दुबे यांच्याशी संवाद साधण्याची संधी विज्ञानप्रेमींना उपलब्ध झाली आहे. आज,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language